अमळनेर (प्रतिनिधी) जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या ‘कामगारांच्या कविता’ या पुस्तकातील ‘चल नांदायला येडी’ या कवितेचा प्रताप महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीएच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
प्रताप महाविद्यालयाच्या स्वायत्त अभ्यासक्रमासाठी काव्यगंध या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकात विविध कवी व लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. काव्यगंध हे पुस्तक बीएच्या प्रथमवर्षं अभ्यासक्रमासाठी संदर्भित केले आहे. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी विविधांगी साहित्याचा अभ्याससक्रमात समावेश केला आहे. कवी कृष्णा पाटील यांच्या कामगारांच्या कविता या कविता संग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत. 

