
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगापुरी-खापरखेडा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आहे. काही ग्रामस्थांना त्यांचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांत मोठी दहशत पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुराख्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बिबट्याला पाहिल्याचे सांगितले. यावेळी खापरखेडा येथील ज्ञानेश्वर नीलकंठ साळवे यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या मालकीची बकरी बिबट्याने पळवून नेली. या घटनेमुळे जनावरांच्या कळपात गोंधळ उडाला असून बकऱ्या व म्हशी गावाकडे धाव घेतल्या. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतमजूरांनी शेतात कामाला जाण्यास नकार दिला असून शेतकरी देखील शेतात जायला कचरू लागले आहेत. परिणामी शेतीकामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.