
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर शंकररराव पवार होते. विवेक सूर्यवंशी व चेतन वैराळे यांनी मार्गदर्शन केले. सुरवातीला ए. बी धनगर यांनी संस्थेविषयी व कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती दिली. सत्राच्या आधी मुलांचे मन एकाग्र करण्यासाठी छोटीशी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. त्यानंतर प्रयोगाला सुरुवात केली. मुलांना डायरेक्ट प्रयोग न दाखवता मुलांना आव्हाने देऊन प्रयोगांचे कारणे विचारून घेतलीत व दाखवलेल्या प्रयोगांची कारण मिमांसा करून त्यांचे निरासन केले. उपस्थित शिक्षक पण प्रयोगाचे कारण जाणून घेण्याचे चांगलाच प्रयत्न करत होते. प्रयोग सिद्ध झाल्यावर मुलाचा प्रतिसाद खूप उत्कृष्ट वाटत होता. प्रत्येक प्रयोगाचे वैज्ञानिक कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. काही मुलांनी स्वतः प्रयोग करून पाहिले व कारणही सांगत होते. ५ वी ते १० वी चें जवळपास एकूण १९७ विद्यार्थी सत्राला उपस्थित होते. प्रयोग झाल्यानंतर मुलांनी सत्राचा अभिप्राय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. धनगर यांनी केले. प्रशांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.