
अमळनेर (प्रतिनिधी) जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीतर्फे युनिक क्लासेस येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
या कार्यक्रमाला युनिक क्लासेसच्या संचालिका व जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीच्या अध्यक्षा दिपीका सोनवणे, सचिव कल्पना पाटील, उपाध्यक्ष सुदर्शना पाटील, रोहिणी शिरसाठ व भारती कोळी उपस्थित होत्या.