
अमळनेर (प्रतिनिधी) मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मुस्लिम समाजातर्फे झालेल्या शिबिरात ३२५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संकल्पनेला अनुसरून दोन ठिकाणी शिबीर घेण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे युवकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.
दुसरं शिबिर अक्सा हॉल, कसाली मोहल्ला येथे रजा ग्रुपच्या युवकांनी आयोजित केलं. या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी होती. तरुण, वयोवृद्ध तसेच समाजातील विविध घटकांनी सहभागी होत रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित केलं. सर्वच उपस्थितांनी या उपक्रमाचं पोलिस अधिकारी, गणमान्य, डॉक्टरानी कौतुक केल आणि म्हटलं की – “रक्तदान हेच सर्वोत्तम दान आहे, कारण ते कोणाचं तरी प्राण वाचवू शकतं.” या उपक्रमातून पैगंबर मोहम्मद साहेबांच्या मानवतेच्या संदेशाचा प्रसार झाला. या उपक्रमाचं समाजातील विविध स्तरांमधून कौतुक करण्यात आलं असून, आयोजकांनी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.