
पालिकेने भर पावसात राबविली स्वच्छता मोहीम
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात नवव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत उदंड अशी गुलालाची उधळण करण्यात आली. यामुळे रस्त्यावर अक्षरशः गुलाबी मॅटिंग अंथरल्याचे चित्र निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाने भर पावसात स्वच्छता मोहीम राबविली.
प्रामुख्याने ईद निमित्त शुक्रवारची नमाज अदा करण्याचा अगोदर, इस्लामपूर मस्जिद समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाला असल्याने याठिकाणी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मोहीम आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष माणिक, मुकादम, गौतम मोरे, नितीन बिऱ्हाडे व वार्डातील कामगार यांनी भर पावसामध्ये ही कामगिरी केली.