शांतताप्रिय मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदाही होणार सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विविध सामाजिक संघटनातर्फे यंदाही शहर व तालुक्यातील गणेशोत्सवात शांततेचे प्रतिक ठरणारे गणेश मंडळ तसेच गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यासाठी दि 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून दगडी दरवाजा जवळ भव्य स्वागत मंच उभारून मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे. सर्व गणेश मंडळांनी  अनंत चतुर्दशीला उत्साहात पण शांततेत मिरवणूक काढून यंदाही श्री सन्मानाचे मानकरी व्हावे, अशी विनंती वजा आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,श्री मंगळग्रह सेवा संस्था,अमळनेर,आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम, व्हॉइस ऑफ मीडिया, अमळनेर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नगरपरीषद, महसूल विभाग व पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान अमळनेर शहर व तालुक्यात पाचव्या, सातव्या, आठव्या नवव्या दिवशी शांततेत विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी देखील यादिवशी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

  • Related Posts

    करणखेडा येथे मिल के चलो असोसिएशनचा वर्धापन दिन साजरा

    अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर शंकररराव पवार होते. विवेक…

    धनदाई महाविद्यालयातील समुपदेशन कार्यक्रमात २०० विद्यार्थी सहभागी

    अमळनेर (प्रतिनिधी) येथील यशवंत सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमयूएसएचए योजनेंतर्गत ‘मुले आणि मुलींसाठी समुपदेशन’ कार्यक्रम झाला. यात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *