अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर बुद्रुक गावचे नाव उदयनगर करण्याबाबत शासनाने मे महिन्यात राजपत्र प्रसिद्ध करूनही ग्रामपंचायतींचे डांगर नाव बदलण्यात आलेले नाही किंवा शासन दप्तरी बदल झालेला नाही. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्राच्या गृहमंत्रालयाने डांगर बुद्रुक गावचे उदयनगर नामकरण करण्यास परवानगी दिली. तीन महिने उलटूनही डांगर बुद्रुक गावाचे नाव शासन दप्तरी उदयनगर झालेले दिसून येत नाही. ग्रामपंचायत कार्यालयावर अजूनही डांगर नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकांवर देखील डांगर असेच नाव आहे. शासकीय पत्रव्यवहारात देखील डांगर असाच उल्लेख केला जात आहे. तहसीलदारांनी १२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व विभागांना गॅझेट सह नावात बदल करण्याचे पत्र दिले आहे. मात्र अद्यापही कुठेच कार्यवाही झालेली नाही.
तहसिलदारांचे पत्र नुकतेच प्राप्त
तहसिलदारांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधिताना आदेश देऊन कार्यवाहीची अमलबजावणी केली जाईल.
–एन. आर. पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर

