
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रोटरी क्लबतर्फे संकल्प या उपक्रमा अंतर्गत साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना गिरीश कुलकर्णी लिखित चांगला माणूस बनवण्याचा हे पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी, सचिव आशिष चौधरी, रोटरीचे सदस्य अभिजित भांडारकर, दिलीप भावसार, निखिल जैन उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची संकल्प चांगला माणूस बनवण्याचा या पुस्तकावर आधारित चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे, रोटरी क्लबतर्फे संपूर्ण शहरात इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाटप केले जाणार असल्याचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी यांनी कळविले आहे. पुस्तक वाटप करताना साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एम. बी. मगरे, ए. बी. पाटील आणि महेंद्र रामोशे उपस्थित होते.