आर्डी येथून अल्पवयीन मुलगी व भाचीला फूस लावून पळवल्याचा गुन्हा दाखल

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील आर्डी येथून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना ९ रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता घडली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आर्डी येथील १४ वर्षे ६ महिने वयाची मुलगी आणि  १५ वर्षे ८ महिने वयाची भाची या दोन्ही मुली ८ रोजी रात्री शेजारी त्यांच्या काकांकडे झोपायला गेल्या होत्या. ९ रोजी मध्यरात्री त्या दोन्ही शौचास जाऊन येतो, असे सांगून निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी त्या परतल्या नाहीत  म्हणून शेजारील महिलेने येऊन सांगितले की तुझी मुलगी आणि भाची कुठे तरी निघून गेल्या आहेत. शोधाशोध करूनही सापडल्या नाहीत म्हणून अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

 

  • Related Posts

    करणखेडा येथे मिल के चलो असोसिएशनचा वर्धापन दिन साजरा

    अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर शंकररराव पवार होते. विवेक…

    धनदाई महाविद्यालयातील समुपदेशन कार्यक्रमात २०० विद्यार्थी सहभागी

    अमळनेर (प्रतिनिधी) येथील यशवंत सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमयूएसएचए योजनेंतर्गत ‘मुले आणि मुलींसाठी समुपदेशन’ कार्यक्रम झाला. यात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *