
अमळनेर (प्रतिनिधी) तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींचा संघ विजयी झाला. त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अमळनेर येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, पंचायत समिती अंमळनेर, आणि तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कॅरम स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या अंडर 17 वयोगटातील चाहत पाटील, देवयानी मोरे, ऐश्वर्या साळुंके या विद्यार्थिनींच्या संघाने बाजी मारली आहे ही स्पर्धा पी. बी. ए. इंग्लिश स्कूल अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती. तरीदेखील या विद्यार्थ्यांनी तालुका विजेतेपद पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान मिळवले. मुलींच्या या विजयामुळे ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात तिसऱ्यांदा विजयाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत विजयी संघाच्या विद्यार्थिनींचे “हमारी छोरियां छोरों से कम है कम है के?” म्हणत जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड .ललिता पाटील यांनी कौतुकाची थाप मारली व प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विजयी संघाचे कौतुक केले आहे. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनींना प्रशिक्षित करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक केदार देशमुख, सागर चावरिया, रमेश धनगर आणि ममता पाटील यांनी परिश्रम घेतले.