
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मराठा महिला मंडळातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात रानभाज्यांची रेसिपी, रांगोळी, मेहंदी आदी विविध स्पर्धाचा समावेश होता. या स्पर्धाना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठा महिला मंडळ अंमळनेर यांनी महिलांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्रावणात मिळणाऱ्या ‘रानभाज्यांची रेसिपी स्पर्धा ‘ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत 30 महिलांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय सुंदर व आश्चर्यकारक रेसिपी सादर केल्या. त्यात त्यांना तीन बक्षिसे व दोन उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली. या रेसिपींचे परीक्षण करण्याचे काम कमल अक्का पाटील व सुलोचना वाघ यांनी बघितले. त्यात सुरेखा खैरनार यांना पहिले बक्षीस मिळाले. दुसरे व तिसरे अश्विनी गरुड यांना मिळाले. उत्तेजनार्थ विद्याताई अहिरे व मंगला रामलाल पाटील यांना मिळाले.
दुसरी स्पर्धा ‘तळणीचे उत्कृष्ट मोदक’ याविषयी झाली. या स्पर्धेत पहिल्या सुरेखा खैरनार, दुसऱ्या विद्या नरेंद्र पाटील व तिसरा क्रमांक प्रबोधिनी पाटील यांचा आला. त्यात उत्तेजनार्थ आरती पाटील यांना मिळाले.
त्याचप्रमाणे ‘हातावरील मेहंदी’ ची व ‘रांगोळी स्पर्धा’ घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत अश्विनी गरुड यांची रांगोळी उत्कृष्ट ठरल्याने त्यांचा नंबर पहिला व सुरेखा खैरनार यांनी दुसरा नंबर पटकावला. तिसरा नंबर सरोज देसाई यांचा आला. मेंदी स्पर्धेत पहिला नंबर अश्विनी गरुड दुसरा प्रतिभा नरेंद्र देसले व तिसरा कोमल पाटील यांचा आला असून त्यांना ती बक्षीस मिळाली. सहभागी स्पर्धकांना मंडळातर्फे भेट वस्तू देण्यात आल्या. मेंदी व रांगोळी स्पर्धेतचे परीक्षण नीता जोशी यांनी केले. या स्पर्धांसाठी मराठा महिला मंडळाच्या सर्व कार्यकारणी मंडळाचे सहकार्य लाभले. या स्पर्धांमध्ये सुरेखा खैरनार व अश्विनी गरुड यांनी उत्कृष्टपणे बाजी मारली. मराठा महिला मंडळाच्या दर महिन्याला स्पर्धा होत असतात. त्यातून महिलांचे निरनिराळ्या प्रकारचे कौशल्य दिसून येत असते.