
अमळनेर (प्रतिनिधी) मार्च महिन्यापासून मुदत संपुनही गौरी सुत प्रतिष्ठानकडून नाट्यगृह खाली केले जात नसल्याने अखेरीस नगरपरिषदेने नाट्यगृहाचा ताबा घेत कुलूप ठोकत कारवाईचा पडदा पाडला. शहरात नगरपरिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह गौरी सुत प्रतिष्ठान यांना कराराने देण्यात आले होते. तीन वर्षासाठी हा करार करण्यात आला होता. हा करार मार्च महिन्यात संपला होता. नियमाप्रमाणे संस्थेने ते नगरपरिषदेच्या ताब्यात द्यायला हवे होते. एप्रिल महिन्यात नगरपरिषदेने गौरी सुत प्रतिष्ठानला नोटीस बजावली होती. सप्टेंबर उलटल्यावरही ताबा मिळाला नाही. त्यामुळे अखेर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने मिळकत व्यवस्थापक महेश जोशी, कर निरीक्षक लौकिक समशेर , मनोज सोनार, निलेश संदानशिव , सतीश बडगुजर, संतोष केदारे, गणेश ब्रम्हे यांनी नाट्यगृह सील केले.