
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात सुरु असलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाई न केल्यास १० रोजी उपोषणास बसण्याचा इशारा विश्वासराव पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी पत्र दिले असून उपोषणास बसण्याची परवानगी मागितली आहे.
पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात तीन अनधिकृतपणे शाळा सुरु आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी २१ ऑगस्ट रोजी अनिधिकृत शाळा तपासणी करून त्या बंदकरण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी ती बाब गाभिर्याने घेतली नाही. २०२३ पासून तातुक्यात सुरु असलेल्या अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जर सर्रासपणे अनधिकृत शाळ सुरु असतील तर इतर शाळानी मान्यता घेवून काय फायदा, पालकांना शाळा मान्यता कशी असते. याबाबत कल्पना नसते. अशा अनधिकृतशाळांचे विद्यार्थी टक्केवारी घेवून इतर अनुदानित शाळेत दाखविले जात असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा शाळांवर कारवाई व्हावी. अन्यथा १०सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा विश्वास पाटील यांनी दिला.