
अमळनेर (प्रतिनिधी) फि-सबीलिल्लाह फाऊंडेशनतर्फे जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या औचित्याने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरात ५५ महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
कसाली मोहल्ला येथे झालेल्या शिबिरात गर्भवती व विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुलींसाठीही विशेष तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच थायरॉईड, कमरदुखी, शरीरातील कमजोरी, गर्भावस्थेशी संबंधित आजार, स्तनरोग इत्यादींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. तपासणी केलेल्या सर्व महिलांना मोफत औषधेही देण्यात आली.
रक्ततपासण्यांवर विशेष सवलत देण्यात आली होती. एएनसी प्रोफाईल, सीबीसी, थायरॉईड, एलएफटी, आरएफटी या चाचण्यांवर ४० टक्के सूट तसेच ब्लड ग्रुप तपासणी व ब्लड शुगर तपासणी फक्त ५० रुपयांत करण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. उज़्मा शेख, डॉ. एजाज रंगरेज, डॉ. रहीस बगवान यांच्यासह साधना पाटील, बबिता कानोजे, राहुल महाजन, भावना महाजन यांनी परिश्रम घेतले. तसेच अरशद पठाण, आकिब खान, वालिद शेख, फरहान शेख, इब्राहिम सर, ज़ुमेर शेख, अरशान खान, मुज़म्मिल शेख, नईम पठाण यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.