अमळनेरात रात्री उशिरापर्यंत लाडक्या बाप्प्पाला शांततेत व उत्साहात दिला निरोप

शांतताप्रिय गणेश मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शांततेत मिरवणुका सुरू होत्या. शहर व तालुक्यात  गणेशोत्सवात शांततेचे प्रतिक ठरणारे व वेळेत आणि शांततेत मिरवणुका काढणारे गणेश मंडळ तसेच गणेशोत्सवात तसेच इतर वेळी समाज कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदाही सन्मान  दगडी दरवाजा जवळ पत्रकार संघ व इतर संस्थातर्फे उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत मंचावरून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्व गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीला उत्साहात पण शांततेत मिरवणूक काढून श्री सन्मानाचे मानकरी व्हावे अशी विनंती वजा आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, श्री मंगळग्रह सेवा संस्था, आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम, व्हॉइस ऑफ मीडिया,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर नगरपरीषद, अमळनेर महसूल विभाग व अमळनेर पोलीस यांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनास उत्तम प्रतिसाद मंडळांनी दिला. या मंचावर सातव्या, नवव्या आणि अखेरच्या दिवशी शांततेत मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना नारळ आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी तुषार नेरकर आदिनाही सन्मानित करण्यात आले. याशिवाय समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणारे लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप,जैन जागृती सेंटर,महिला हाऊसिंग ट्रस्ट, आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर महिला मंच, न प अग्निशमन दल, जायंट्स ग्रुप, अमळनेर पोलीस पाटील संघटना, सात वर्षांपासून पर्यावरणपूरक विसर्जन करणारे राजमुद्रा फाऊंडेशन,रक्तदान मोहीम राबविणारे मुस्लिम बांधव, बंदोबस्तातील पोलीस कर्मचारीना फूड पॅकेट्स वाटप करणारे विवेकसंकलेचा, रोनक संकलेचा व बिर्याणी हाऊसचे शेखर राजपूत आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी आदित्य ग्रुपचे प्रशांत निकम, मंगळग्रह संस्थेचे डॉ डिगंबर महाले व तिन्ही पत्रकार संघटनांचे शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले.

 

अनेक मंडळांच्या मिरवणुका ठरल्या आदर्श

 

अनंत चतुर्दशीला 39 मंडळांचे गणेश विसर्जन झाले. यांपैकी अनेक मंडळांनी दिवसा व गुलाल विरहित, पारंपरिक वाद्य लावत मिरवणुका काढून एक आदर्श निर्माण केला. तर इतर मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी 7 नंतर सुरू झाल्या दगडी दरवाजातुन येणाऱ्या मंडळाव्यतिरिक्त शहरातील इतर मंडळे वेळेच्या आत दगडी दरवाजा जवळ पोहोचून मिरवणुका विसर्जित झाल्या. माळी वाड्यातील त्रिमूर्ती मंडळ, पवनपुत्र मंडळाचा भोई वाड्याचा राजा, पान खिडकीतील जय बजरंग मंडळ व शिवशक्ती मंडळाचा शिवशक्तीचा राजा या मिरवणुका विशेष आकर्षण असल्याने येथे कार्यकर्ते आणि पाहण्याऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्रिमूर्ती मंडळाने नर्सिम्हाचा सजीव देखावा सादर केला होता. तर भोईवाडा व जय बजरंग मंडळाची मूर्ती मोठी व प्रचंड आतषबाजी करण्यात येत होती. मंडळांना दगडी दरवाजातुन पुढे काढण्यात पोलिसांची प्रचंड कसरत झाली. जय अंबे मंडळाच्या मिरवणुकीत महिला मेनबत्ती हातात घेऊन सहभागी झाल्या होत्या तर बँड वर फक्त देशभक्तीपर गीत वाजविण्यात येत होते. अनेक मंडळात हनुमान चालीसा सादर झाली. यावेळी काही मुस्लिम बांधवानी विविध गणेश मंडळातील गणेश भक्तांचा सत्कार केला. रात्री उशिरा दगडी दरवाजा तुन मिरवणुका बाहेर पडल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. नवव्या दिवशी 34 मंडळांचे विसर्जन झाले होते.

गणेश मूर्तीचे असे झाले विसर्जन

 

गणेश मूर्तीचे तापी नदी पात्रात सावखेडा, जळोद, सावळदे येथे विसर्जन झाले तर लहान मूर्ती बोरी पात्रात विसर्जित करण्यात आल्या. यासाठी नगरपरिषदेने व्यवस्था केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या शेवटपर्यंत ठाण मांडून होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात होता. होमगार्ड पथकाने देखील विशेष जवाबदारी सांभाळली.

 

रस्ते झाले गुलालमय

 

दरम्यान काही मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण झाल्याने रस्ते गुलालमय झाले होते. देवा लांडगे यांनी वाघ आणि चौधरी बंधूच्या सहाय्याने दगडी दरवाजाचा वरून प्रत्येक मंडळावर पताक्यांची आतषबाजी केली. पत्रकार बांधवाच्या विशेष सहकार्याबद्दल पोलीस प्रशासनाने कौतुक केले.

 

  • Related Posts

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

      ❇️ TCS /IBPS pattern ❇️   1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र 👉 भारतातील पहिले सेंद्रिय…

    केटी वेयर बंधाऱ्यांच्या नित्कृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान

    अमळनेर (प्रतिनिधी) केटी वेयर बंधाऱ्यांच्या नित्कृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील रामेश्वर येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल विभागाकडे केली आहे.   शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, …

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *