
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपळे खु, पिंपळे बु, चिमनपुरी, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे, अटाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तर सर्वाधिक फटका कापसाला बसत आहे. अमळनेर तालुक्यात सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर मर रोगाची सुरुवात झाली आहे. कापसाच्या झाडाची मुळे सडू लागल्या झाडांना बुरशी लागली आहे. लालसर होत आहे. तरी काही शेतकऱ्यांचे मर रोगामुळे व बऱ्याच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच सततच्या पावसामुळे मकच्या कनिसाला कोंब फुटले आहेत. मका पिक आडवे पडू लागले आहे. यंदा निसर्गाने भरभरून दिले, पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसानग्रस्तांना सरसकट पंचनामे शासनाने करावे, असे शेतकरी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.