
अमळनेर (प्रतिनिधी) मुसळधार पावसाने शहरातील गरीब मजुराचे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रशासन व नागरिकांकडून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मिलचाळ परिसरात हात गाडीवर कुल्फी व भाजीपाला विक्री करणारे श्रीरंग सातपुते यांच्या घराचे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने घराचे छत कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या गणपतीच्या आरतीच्या वेळेसच ही घटना घडली होती. सुदैवाने यात सातपुते हे बचावले आहेत. या घटनेस आठ दिवस होऊनही प्रशासनाकडून कोणतीही मदत झालेली नाही. मजुरी करून आपले पालन पोषण करीत असताना संततधार पावसात डोक्यावर छत नसल्याने सातपुते हे हवालदिल झाले असून शहरातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.