
अमळनेर (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्ताने तालुक्यातील रुंधाटी येथील रामराज्य गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी रक्तदानाचे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 31 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
एक दिवस गावासाठी ही संकल्पना राबवून रक्तदान शिबिराचे आयोजन गणेश मंडळाने केले होते. शिबिराचे उदघाटन उपसरपंच प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अमळनेर जीवनश्री ब्लड बँकेकडून हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यासाठी पत्रकार सागर मोरेंचे सहकार्य लाभले. पोलीस पाटील शैलेश पवार, जितू पवार, दिलीप पवार, विजय पवार यांचे शिबिरावेळी मार्गदर्शन लाभले. रक्तदान शिबिरात भूषण पाटील, दिपक भिल, राहुल पवार, प्रवीण पवार, गोपाल पवार, अनिल पवार, हर्षल पाटील, सूर्यकांत पवार, दिलीप पवार, निलेश पाटील, सचिन पाटील, किरण पवार, समाधान पवार, मनोज पवार, रविंद कोळी, नरेंद्र पवार, मयूर पवार, मोतीलाल भिल, प्रमोद पवार, विजय पवार, चेतन पवार, शैलेश पवार, गोपाल पवार, नितीन पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पवार,दर्शन पवार,राहुल पवार,अजय मोतीराळे, शरद पाटील, दिपक पवार आदी 31 तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. जीवनश्री ब्लड बँकेचे योगेश महाले, टेक्निशियन शुभांगी माळी, गौरव पालीवाल,सुनीता गावित आदींनी शिबिर यशस्वी केले केले.