
अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील धनदीप बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त महिलांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
निबंधासाठी “शिकलेली स्त्री- कुटुंबाची आणि राष्ट्राची आधारशिला‘, “आजच्या युगात महिलांचे शिक्षण किती महत्त्वाचे?” , “शिक्षणामुळे घडणारी स्त्री: काल, आज आणि उद्याचे चित्र’, आजची महिला आणि सोशल मिडिया, माझ्या आयुष्यातील एक आदर्श महिला व्यक्तीमत्व हे विषय आहेत. निबंधासाठी शब्द मर्यादा सुमारे ८०० शब्द आहे. निबंध कागदावर लिहून छाया इसे ९४२०११२४४७, यमुताई अवकाळे पाटील (९५१८७४७०१५) , रेखा वाल्मीक पाटील (९४२११६४५५२) यांच्याकडे व्हाटस् अप नंबरवर ७ सप्टेंबर पर्यंत पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेचा निकाल १५ सप्टेंबर पर्यंत जाहीर करण्यात येईल. पहिले तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू नवरात्री उत्सवाच्या काळात एका नियोजित कार्यक्रमात दिल्या जातील.