
अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी शहरातून दोन मोटारसायकली लंपास केल्या असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील माळी वाडा भागात राहणारे पालिकेचे कर्मचारी विजय महाजन हे २८ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता पालिकेत आपल्या कार्यालयीन कामासाठी आले असताना त्यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स ही मोटारसायकल (एम.एच. १९ डीजे २०३० ) पालिकेच्या पार्किंग शेडमध्ये पार्क केली व कामकाजासाठी आत निघून गेले. दुपारी १ वाजता घरी जेवण्यासाठी जायला जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांना त्यांची मोटारसायकल पार्किंग शेड मध्ये दिसून आली नाही. त्यांनी पालिकेच्या आवारात मोटारसायकलचा शोध घेतला असता कुठेही मोटारसायकल न सापडल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. तर दुसऱ्या घटनेमध्ये शहरातील पान खिडकी, सराफ बाजारात राहणारे जितेंद्र कोठारी यांनी २० रोजी रात्री १० वाजता राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ॲक्टिव्हा स्कूटर (एम.एच. १९ सी एन ३०६२) लावलेली होती.२१ रोजी सकाळी ७ वाजता त्यांना त्यांची स्कूटर जागेवर दिसून आली नसल्याने त्यांनी स्कूटरचा परिसरात शोध घेतला मात्र स्कूटर मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.