
ग्रामपंचायत आदर्श शिक्षक पुरस्काराने उपशिक्षिका रेखा पाटील सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्श गाव जवखेडे येथील ग्रामपंचायततर्फे शिक्षक दिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी उपशिक्षिका रेखा पाटील यांना ग्रामपंचायत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षिका सुनिता रत्नाकर पाटील व त्याचे पती रत्नाकर संभाजीराव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. दोघाही शिक्षिकांना मयुर पाटील यांचेकडून शिक्षक दिनानिमित्त 2100 रुची सप्रेम भेट देण्यात आली. तसेच प्रकाश यशवंत पाटील यांचे वतीने यशवंत दत्तु पाटील यांचे स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार रोख 1100 रु. व सन्मानचिन्ह, तसेच चंद्रभान यशवंत पाटील यांचे वतीने कृष्णाबाई यशवंत पाटील स्मरणार्थ आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार रोख 1100 रुपये व स्मृतिचिन्ह व सुरेश यशवंत पाटील यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकास 2100 रु.रोख व मानपत्र अशी वेगवेगळी बक्षिसे येत्या 26 जानेवारी पासून विद्यार्थ्यांना देण्याचे मयुर पाटील यांनी जाहीर केले. यावेळी सरपंच जयश्री माळी, उपसरपंच दिनकर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील, माजी जिप सदस्य संदिप पाटील, बाला उपक्रम समिती अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष रविंद्र माळी, माजी सरपंच नेताजी पाटील, उपसरपंच चुडामण पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निंबा पाटील, जिजाबराव पाटील, हिरा चव्हाण, मनिषा धनगर, ग्रामसेवक न्हाळदे, भुषण जैन, जगदिश पाटील, सर्व अंगणवाडीसेविका बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. यावेळी निंबा पाटील, संदिप पाटील, मुख्याध्यापक छगन पाटील यांनी व पुरस्कारार्थी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अर्चना बागुल यांनी केले. आभार मुकेश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सुनिता पाटील, अर्चना बागुल, मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले.