प्रताप हायस्कूलमध्ये स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप हायस्कूलमध्ये स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
संपूर्ण देशात 79 वा स्वातंत्र दिवस साजरा केला जात आज अशा वेळी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा छोटासा प्रयत्न संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वेच्छेने मोफत गणवेश वाटप केले. त्यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी सचिव मुख्याध्यापक निकम, चंद्रकांत कंखरे, किरण सनेर, कल्पेश सुर्यवंशी, कृष्णा कोळी, विनोस पाटील आदी सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.