पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिला सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघातर्फे लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे उत्साहाने झाला.सुरुवातीला पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.सा.प अध्यक्ष संदीप घोरपडे होते. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील,  मौर्य  क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत,  प्रा. अशोक पवार, राजश्रीताई पाटील, डी. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अजय भामरे यांनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर कविता सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषण विनोदी पद्धतीने करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, नितीन पाटील, हरचंद लांडगे, रियाज शेख, रज्जाक शेख उपस्थित होते. प्रास्ताविक एस. सी. तेले यांनी केले. कार्यक्रमाची सर्व व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी करून दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश देव शिरसाठ, नितीन निळे,गोपीचंद शिरसाठ, प्रदीप कंखरे, दिलीप ठाकरे, विजय मोरे, दयाराम पाटील, ईश्वर महाजन, उमेश काटे, गोपाल हडपे, बापूराव ठाकरे, प्रा. दिनेश भलकार, प्रा. मनोज रत्नापारखे, विकास सुर्यवंशी, धनराज लांडगे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्नेहा एकतारे यांनी केले. आभार आनंदा धनगर यांनी मानले.

 

पुरस्कारार्थी महिला अशा

 

जयश्री पवार, पूजा शहा, भारती सोनवणे, माधुरी पाटील, डॉ. मनीषा लाठी, सुवर्णा धनगर, सुशीला अहिरे, क्रांती पाटील, भारती बाविस्कर, आशा महाजन, आशाबाई लांडगे, जयश्री बडगुजर, मनिषा पाटील, प्रा. डॉ. शबीना  शेख, सुदर्शना पाटील, तिलोत्तमा पाटील, सीमा रगडे, अश्विनी भिल, रूपाली धनगर या महिलांना देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *