तिरंगा रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमले
अमळनेर (प्रतिनिधी) “हर घर तिरंगा अभियान अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे दि. १४ ऑगस्ट रोजी शहराच्या इतिहासातील एक भव्य आणि अविस्मरणीय तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून निघाली. तसेच देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आयोजकांकडून सर्व सहभागींस स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून ९०० मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह रॅलीचा शुभारंभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या गजरात, विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी व अधिकारी यांच्या उस्फूर्त सहभागाने रॅली स्टेशन रोड मार्गे तिरंगा चौकापर्यंत पोहोचली. तेथे राष्ट्रगीत व राज्यगीताच्या ध्वनिफितीवर राष्ट्रध्वजास मानवंदना देत कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला. कार्यक्रमाचे यश हे नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाचे फलित ठरले. खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सर्वांना देशभक्तीची जाणीव करून देत सांगितले की, “नागरिक म्हणून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडून, तिरंग्याबद्दलची निष्ठा व देशाचा स्वाभिमान सदैव अबाधित ठेवणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असावे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर अभियंता डींगबर वाघ व संजय पाटील यांनी केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आभार मानले.
रॅलीत धनदायी महाविद्यालय , जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय , प्रताप महाविद्यालय , भगिनी मंडळ शाळा , लोकमान्य शाळा , सानेगुरुजी कन्या शाळा , डी आर कन्या शाळा , स्वामी विवेकानंद शाळा , नवीन मराठी शाळा , मंगळ ग्रह सेवा संस्था, उपविभागीय अधिकारी नितिन मुंडावरे, पोलीस अधीक्षक विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, महावितरणचे नेमाडे भैरवीताई वाघ-पलांडे, डॉ. अनिल शिंदे,प्रा शीला पाटील , शीतल देशमुख , राकेश पाटील , उमेश वाल्हे , महेश पाटील , भारती सोनवणे , करुणा सोनार आदी उपस्थित होते. या भव्य रॅलीसाठी रवींद्र चव्हाण (उपमुख्याधिकारी), सुनील पाटील (स्थापत्य अभियंता), अजित लांडे (स्थापत्य अभियंता), कुणाल महाले (विद्युत अभियंता), सुदर्शन शामनानी (लेखापाल), कृणाल कोष्टी (लेखापरीक्षक), मयूर तोंडे (नगर रचनाकार), सौरभ बागड (नगर रचनाकार), किरण कंडारे (स्वच्छता निरीक्षक), संतोष माणिक (स्वच्छता निरीक्षक), गणेश गोसावी (अग्निशमन अधिकारी), संदीप पाटील (संगणक अभियंता), वैद्यकीय अधिकारी विलास महाजन व प्रवीण शेलकर, डॉ विलास महाजन,महेश जोशी, लौकिक समशेर, रोहित रामोळे, कैलास कसाब, विनोद पाटील, प्रवीण बैसाणे, भाऊसाहेब सावंत, चंद्रकांत मुसळे, गणेश गढरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
रॅलीच्या पुढे अग्निशमन दलाच्या मोटारसायकली , सजवलेले बंब , ट्रॅक्टर वर विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी , देशासाठी योगदान दिलेल्या महिलांची वेशभूषा केलेल्या सानेगुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनी चालत होत्या. लायन्स क्लब , निरज अग्रवाल , नगरपालिका यांच्याकडून बिस्कीट , चॉकलेट , पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.