शिरुड येथील हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेवर केले मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरुड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक शालिग्राम मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण शालिग्राम मोरे उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळेचे नियोजन, अभ्याससाहित्याची निवड आणि मुलाखतीतील आत्मविश्वास याबाबत सविस्तर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणात कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येय निष्ठा यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. या प्रसंगी शालेय समितीचे सदस्य योजना पाटील, ग्रंथालय संघाचे तालुका अध्यक्ष शशिकांत रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी, हेमंत सोनवणे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गुलाब बोरसे यांनी केले. पी. जे. निकम यांनी आभार मानले.