स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
🔷 चालू घडामोडी :- 14 ऑगस्ट 2025
◆ IIT रुरकीने कंपाउंड 3B नावाचे एक नवीन औषध विकसित केले आहे, जे औषध – प्रतिरोधक धोकादायक जीवाणूंशी लढते.
◆ ऑगस्ट 2025 मध्ये केनिया देशाने मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस (HAT) नष्ट केल्याचे प्रमाणित केले.
◆ गृह मंत्रालयाने राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन ‘मानस’ सुरू केली.
◆ शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी पंजाब राज्य सरकारने बाज अख-अँटी ड्रोन सिस्टम (ADS) सुरू केली आहे.
◆ रमेश बुधियाल आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये खुल्या पुरुष गटात 12.60 गुणांसह कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
◆ सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी रंगपो येथे पहिल्या अम्मा सन्मान दिनानिमित्त ‘नारी अदालत’ सुरू केली.
◆ स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम (SIMS) 2.0 पोर्टल पोलाद मंत्रालयाने सुरू केले.
◆ आशिया रग्बी (20 वर्षांखालील) चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने महिला गटात कांस्य पदक जिंकले.
◆ राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
◆ भारतातील केरळ आणि तामिळनाडू राज्यात मुथुकन जमात प्रामुख्याने आढळते.
◆ खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26 चे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती संरक्षण निखिल खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
◆ जपानी बॉक्सर हिरोमासा उराकावा यांचे टोकियो येथे झालेल्या लढतीदरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने निधन झाले.
◆ केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26 चे उद्घाटन झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल, अमळनेर