श्री साई गजानन सेवा मंडळातर्फे कपिलेश्वर पायी वारी

अमळनेर (प्रतिनिधी) पवित्र श्रावणमासी श्री साई गजानन सेवा मंडळातर्फे कपिलेश्वर पायी वारी काढण्यात आली. गण गण गणात बोतेचा मंत्र म्हणत सुमारे २२० भक्त, भाविक कपलेश्वरकडे रवाना झाले.

श्री क्षेत्र अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारी सकाळी साडेपाच वाजता मोठेबाबा मंदिरावर महाआरती होऊन निघाली. मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील, सचिव विठ्ठल पाटील यांनी आरती केली.त्यानंतर भाविक रवाना झाले. भाविक कॉलेजच्या जवळ जितेंद्र बोरसे यांनी राजगिरा लाडू प्रसाद प्रत्येक भक्तांना दिला. पुढे धारला शशिकांत पाटील यांनी वारकऱ्यांसाठी टेंट टाकून मोठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद सर्व वारकऱ्यांना दिला. अध्यक्ष सचिव तसेच गुणवंत पवार, आर. व्ही. पाटील, लक्ष्मण निकम, विश्राम महाराज विणेकरी चा टोपी रुमाल देऊन श्रीफळ देऊन सन्मान केला. शशिकांत पाटील व त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल जावई त्यांना टोपी टॉवेल देण्यात आला संपूर्ण गावांमध्ये पालखीच्या आरत्या करत वारी पुढे मार्गस्थ झाली. पुढे मारवड पेट्रोल पंपावर ज्ञानेश्वर शांताराम पाटील यांनी प्रत्येक वारकऱ्याला चिवडा पाकीट वाटप केले. मारवाडला कालभैरव मंदिरावर ट्रस्टी आयोजक मुकेश साळुंखे यांनी महाप्रसाद दिला. मंदिराचे अध्यक्ष निंबा पाटील यांचे स्वागत एस. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एल. जी. चौधरी, संजय साळुंखे, शांताराम पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, माँ जिजाऊ जेष्ठ महिला मंडळच्या रजनी पाटील, योगिता डहाळे उपस्थित होते. पुढे रस्त्यावर किशोर चौधरी यांनी चिक्कींचे वाटप केले. चाकवेकर दिलीप राजाराम पाटील, नितीन नीलकंठ पाटील ढेकू यांनी खजूर पाकिटाचे वाटप केले. पुढे कळमसरे येथे सरपंच पिंटू राजपूत यांनी वारकऱ्यांचे मोठे स्वागत केले. कपिलेश्वर संस्थांच्या वतीने श्री साई गजानन सेवा मंडळचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील यांना मानाचे श्रीफळ देऊन गादीपती महामंडलेश्वर श्री हंसांनंदजी तीर्थराज महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंडळाचे सचिव विठ्ठल भावराव पाटील, पत्रकार राकेश पाटील, चंद्रकांत नामदेव पाटील, गुणवंत पवार वाल्मीक मराठे, डहाळे सर, आर. व्ही. पाटील, संभाजी पाटील, महाले सर शनि महाराज, विश्राम महाराज यांचा सन्मान कपिलेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आला करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *