शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेतर्फे पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांना आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेतर्फे ब्राम्हण समाजातील इ.१० वी, इ.१२वी व पदवी परीक्षेत विशेष गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, पुणे यांच्यातर्फे विशेष गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये वरील परीक्षेत ७०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी पारितोषिके मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. या वर्षाचे फॉर्म संस्थेकडे प्राप्त झाले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी मार्कशीटची झेरॉक्स, बँक अकाउंटची झेरॉक्स सोबत जोडून फॉर्म त्वरित भरावा. फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट असून फॉर्म मिळण्यासाठी व जमा करण्यासाठी पंकज सुरेश मांडे (सचिव मो.-७५८८४०३४०८) पाठक गल्ली, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर जगन्नाथ जोशी यांनी केले आहे.