नगरपरिषदेतर्फे काढली बाईक रॅली, आज शहरातून निघणार तिरंगा रॅली

अमळनेर (प्रतिनिधी) नगर परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा अभियान २०२५’ अंतर्गत शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातून सुरू होऊन मंगलमूर्ती चौक, महाराणा प्रताप चौक, नगर परिषद कार्यालय, दगडी दरवाजा, तिरंगा चौक या मार्गाने पार पडेल.

नगर परिषद कार्यालयातून सकाळी ८.३० वाजता मोटर-बाईक रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा मार्ग राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक, रेल्वे स्टेशन रोड, सुखांजनी हॉस्पिटल मार्गे पुन्हा नगर परिषद येथे संपला. देशभक्तिपर गीते, फायर फायटर, घंटा गाड्या व इतर वाहनांवर लावलेले तिरंगे पोस्टर यामुळे रॅलीत देशप्रेमाचा उत्साह ओसंडून वाहत होता. या रॅलीत मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, अभियंता दिगंबर वाघ, सुनील पाटील, अजित लांडे, नगररचनाकार मयूर तोंडे, सौरभ बागड, लेखापाल सुदर्शन शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे, फायर ऑफिसर गोसावी साहेब, सहाय्यक मिळकत व्यवस्थापक महेश जोशी, डॉ. राजेंद्र  शेलकर, डॉ. विलास महाजन, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे, संतोष बिऱ्हाडे, सहाय्यक कर निरीक्षक रोहित रामोळे, संगणक अभियंता संदीप पाटील तसेच कर्मचारी वर्गाचा सहभाग लक्षणीय होता.

 

उद्या निघणार पालखी

 

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक नगर परिषद, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक, सुखाजनी हॉस्पिटल मार्गे पुन्हा नगर परिषद येथे समारोप होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांसाठी ध्वनी प्रणाली, आवश्यक नियोजन व पोलिस बंदोबस्ताची विनंती नगर परिषदेने केली असून, शाळा, महाविद्यालये, पत्रकार संघ, सामाजिक संस्था व नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *