अमळनेर तालुका जुक्टो संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. जितेश संदानशिव
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी प्रा.जितेश संदानशिव यांची तर सचिवपदी प्रा.पंकज तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रा.शालिनी पवार, खजिनदारपदी प्रा.स्वप्नील भांडारकर, लेखा परीक्षक म्हणून प्रा.विलास पाटील, वरिष्ठ सल्लागार म्हणून प्रा.सी.बी.सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रा.गुणवंत पाटील, प्रा.योगेश वाणी, प्रा.बी.एस.शेलकर, प्रा.मनीषा पाटील व प्रा.किर्ती पाटील यांची निवड करण्यात आली. प्रा.स्वप्निल पवार व प्रा.दिनेश बोरसे या दोघांची निवड जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून करण्यात आली. या वेळी सभेचे अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.के.अग्रवाल होते. इतर संघटनेचे सर्व सदस्य प्राध्यापक, खा.शी.मंडळाचे नवनिर्वाचित प्राध्यापक प्रतिनिधी डी .व्ही. भलकार व संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील उपस्थित होते.