माजी आमदार शिरीष चौधरी शिंदे सेनेच्या वाटेवर, १५ ऑगस्टनंतर प्रवेश

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात मोठ्या घडामोडी होणार असून माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे १५ ऑगस्टनंतर शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे मतदार संघाचे राजकीय समिकरणही बदलणार आहे.

अमळनेर येथे  झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर याचा खुलासा केल्याचे समजते. माजी आमदार शिरीष चौधरी हे अमळनेर विधानसभेत सन २०१४ साली माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांना पराभूत करीत अपक्ष निवडून येत सत्तेत सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी मागील पंच वार्षिक व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. यात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. दरम्यान शिरीष चौधरी यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक बोलावून मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत जाण्यास संमती दर्शवली. नगरपालिकेत युती होणार नाही. शिंदे सेनेकडून स्वतंत्र पालिका लढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार  चौधरी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून १५ ऑगस्टनंतर शिंदे यांची तारीख घेऊन शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक देखील लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *