अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत 12 पदांच्या भरतीस स्थगिती
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आस्थापनेवरील 12 पदांच्या नोकर भरतीस जिल्हा उपनिबंधकांकडून स्थगिती मिळाली आहे. यामुळे संपूर्ण तालुक्याभरात बोलले जात आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील शिपाई 5, पहारेकरी 2 व माळी 1, निरीक्षक 1, सुपरवायझर 1 व कनिष्ठ लिपिक 2 ही पदे भरण्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नोकर भरती धोरण निश्चित होईपर्यंत बाजार समितीमधील परंपरागत नियुक्तींना मान्यता व नवीन भरतीस परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव यांना दिनांक 1 ऑगस्ट रोजी पाठवले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील नोकरभरतीला स्थगिती मिळाल्यामुळे संपूर्ण तालुक्याभरात जोरदार चर्चिले जात आहे.