जुन्या आठवणींना उजाळा देत सतरा वर्षापूर्वींचे ऋणानुबंध केले अधिक घट्ट
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात २००७-०८ वर्षातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या वेळी उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले नवे ऋणानुबंध बळकट केले.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सतरा वर्षांपूर्वी दहावीनंतर शाळा सोडून गेलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. शालेय वातावरणात रममाण होऊन वर्गशिक्षक संजय पाटील यांच्या हातून छड्या घेऊन आठवणींना उजाळा देत वर्गात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रुती पाटील होत्या. विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. एकमेकांचा परिचय देऊन सतरा वर्षात आलेल्या सुखद आणि दुःखद प्रसंग, विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. शालेय जीवनातील मैत्री पुन्हा घट्ट करण्यासाठी भावी आयुष्यात एकमेकांना सहकार्य आणि संकटात मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी संजय पाटील, प्रभुदास पाटील या शिक्षकांनी तर शीतल पाटील , सुवर्णा पाटील, भूषण खैरनार, सोनी धनगर, प्रियंका पाटील, अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, सीमा मोरे, सीमा पाटील, राहुल पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, सुदर्शन पवार, खुशाल पाटील उपस्थित होते.