स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढली तिरंगा रॅली
अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर आणि साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी, भारताचा तिरंगा ध्वज हातात धरून “भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’च्या घोषणा दिल्या.
तिरंगा रॅली स्टेशन रोड, न्यु प्लॉट, कन्या शाळा मार्गे धुळे रोड, तहसील कार्यालय अशी काढण्यात आली, रॅलीत एनसीसीसह सातवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी मुख्याध्यापक एस. बी. पाटील, सुनील पाटील, डी. ए. धनगर, आर. एम. देशमुख, वाय. एस. मोरे, महेंद्र रामोशे यासह शिक्षक, शिक्षीका सहभागी झाल्या होत्या.