मुंबई येथे ड्युटीवर असलेल्या अमळनेर येथील पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पिंपळे रोडचे रहिवासी मुंबई येथील अँटॉप हिल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी मुंबई येथील मॅक्सीलाईफ हॉस्पिटलमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की अविनाश राजेंद्र सोनवणे हे ६ रोजी कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. ७ रोजी त्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचे शव अमळनेर येथे वामननगर येथील घरी आणण्यात येणार आहे. त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात येणार आहे. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी, दोन बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.