तहसील व उपविभागीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या तहसील व उपविभागीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, महसुल नायब तहसिलदार अजय कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके, संगायो नायब तहसिलदार आर.आर. ढोले यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यात तहसील कर्मचारी मुकेश काटे, जगदिश पाटील, अनिल चौधरी, प्रदिप महाले, सचिन निकम, किरण मोरे, जितेंद्र पवार (सर्व महसुल सहाय्यक), नईम मुजावर, पंकज शिंपी (उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय) यांना गौरवण्यात आले.