“हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” च्या जयघोषात अमळनेरात श्रोते झाले तल्लीन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरातील श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात झालेल्या भजन संध्या मध्ये “हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात श्रोते तल्लीन झाले.
लखतादार भक्त परिवार आणि मंगळ ग्रह सेवा संस्थातर्फे ५ रोजी रात्री कार्यक्रम झाला. भुसावळ सुप्रसिद्ध भजनकार किशन चावराई यांनी सुमधुर भजने सादर करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. “करणारा श्याम… करवणारा श्याम!” या भावनेत रंगलेल्या श्रोत्यांनी मनापासून आनंद घेतला. कार्यक्रमाला मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाला अमळनेर व परिसरातील श्यामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी विनोद अग्रवाल, नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, प्रसाद शर्मा, गोपाल अग्रवाल, यश जैन, राज जैन, ध्रुव पारख, रोहित छाजेड, बंटी सैनानी, प्रितेश मणियार, हरिओम अग्रवाल, ऋत्विक भामरे, व्यंकटेश शर्मा, हितेश बित्राई, रोनक शाह, कुशल कोठारी, कृष्णा वर्मा, जय नागदेव, दिशांना जोशी मंगल सेवेकरी पुषंद ढाके, रवींद्र मोरे, मनोहर तायडे आदींचे सहकार्य लाभले.