तांदळी येथे 15 ऑगस्ट रोजी होणार विद्यार्थी गुणगौरव सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तांदळी येथे तांदळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यामार्फत 15 ऑगस्ट रोजी 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. दुपारी साडेतीन ते साडेपाच या दरम्यान सभा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे.
गावातील शैक्षणिक वर्ष मार्च 25 मध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार गोपी दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
गावातील 10 वी ,12 वी उत्कृष्ठ गुणांनी उर्त्तीण विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांची झेरॉक्स प्रत सह आपले नाव तांदळीचे सरपंच प्रतिनिधी सुनील इंदलसिंग परदेशी यांच्याकडे समक्ष अथवा 9373150876 या नंबर वर करावी व कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन तांदळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले आहे.