अमळनेरात आज श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक आणि सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त अमळनेर समस्त साळी समाज पंच मंडळतर्फे गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी पोथी वाचन, जन्मोत्सव सोहळा व मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन समाजबांधांनी केले आहे.

श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त  सकाळी ६ वाजता साळी समाज पंच मढी साळी वाडा येथे श्री. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्तबपोथी वाचन, आरती, तिर्थ प्रसाद व सत्यनारायण पुजन होणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता श्री. भगवान जिव्हेश्वराची पालखी मिरवणूक आयोजित केली आहे. समस्त साळी समाज पंच मढी, साळी वाडा येथून श्री जिव्हेश्वर मंदिर श्रीकृष्णपुरापर्यंत ही मिरवणूक निघणार आहे. सर्व समाज बंधू व भगिनिंनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रात्री ८.३० वा. साळी समाज पंच मढी  येथे साई लहरी भजन संध्या कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी विशेष निमंत्रित अतिथी म्हणून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक तथा मंगळ ग्रह मंदिराचे विश्वस्त अनिल श्रीधरराव अहिरराव असतील.

दरम्यान सकाळी ९ वाजता मान्यवर व जेष्ठ नागरिकांचा स्वागत समारंभ व  मनोगत तसेच गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा गुण गौरव होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथीं नायब तहसीलदार प्रशांत धमके, अर्बन बँक संचालक दीपक साळी, साळी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत हरचंद साळी, माजी नगरसेवक साहेबराव पवार, पारोळा येथील माजी नगरसेविका संध्याताई पुरुषोत्तम मुंदाणकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष शोभाताई जगदीश साळी, माजी अध्यक्ष मधुकर ताराचंद वखारे, पुरुषोत्तम लष्करे, दिनकर बागुल, चंद्रशेखर चोपदार, रवींद्र लष्करे, बाबुलाल बडकस, जयदीप वखारे आदींची उपस्थिती लाभणार आहे. उपस्थितीचे आवाहन साळी समाजाचे अध्यक्ष दिलीप मुंदाणकर, प्रताप साळी, उपाध्यक्ष जगदीश साळी, राजेंद्र साळी,सचिव राजेश साळी, अविनाश चोपदार, खजिनदार संजय आहिरराव, नामदेव साळी व समस्त कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

 

दुपारी होणार महाप्रसाद

 

महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत करण्याचे योजिले आहे. तरी सर्व समाजबांधवाणी सहपरिवार उपस्थित राहून मिरवणूक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, सदर कार्यक्रम श्री जिव्हेश्वर मंदिर श्रीकृष्णपुरा, आणि साळी समाज पंच मढी येथे होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *