पोर्टलसह वृतपत्रामध्ये डेंग्यूचे वृत्त झळकताच हिवताप अधिकारी अमळनेरात धडकले
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर पोर्टलसह वृतपत्रात दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा हिवताप अधिकारी अमळनेरात दाखल झाले. त्यांनी तातडीने रुग्णांच्या घरी भेट देऊन कंटेनर सर्वेक्षणाची फेर पडताळणी केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशान्वये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनाळकर, आरोग्य निरीक्षक डॉ. रमेश धनराळे यांनी अमळनेर शहरांतील शहरातील रुग्णांचे घरी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली. प्रत्यक्ष कंटेनर सर्वेक्षणाची फेर पडताळणी करुन सदरील भागातील कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शनही केले. या प्रभागात किटकनाशक धूर फवारणी करण्यात आली. तसेच डेंग्यू व हिवताप होऊ नये म्हणून डासांचे जीवन चक्र खंडित करणेसाठी नाविन्य पूर्ण योजना म्हणून पाण्याचे हंगामी व कायम स्वरुपी डबक्यामधे ऑईल बॉल (चेंडु) सोडण्यात आले. पुढील आठवड्यात वन टाईम अॅक्टीव्हीटी राबविण्या बाबत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांची सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. नागरीकाना कोरडा दिवस पाळणे, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे, परीसर स्वच्छता राखणे, उघडयावरील टायर, मटकयांची विल्हेवाट लावणे बाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले.
चार पथके केली कार्यान्वित
या प्रभागात आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे व आरोग्य निरीक्षक किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास माकडे, विजय दासतुंर, सरला महाजन, सरीता परदेशी, गढरी, मंदा चौधरी, जयश्री बारी यांची चार पथके सर्वेक्षण करीत आहेत. नागरीकांच्या घरातील भांडे, फ्रिज, टायर, खुल्या जागेतील नारळाच्या करवंट्या तुटलेले प्लास्टीक भांडे यातील डेंग्यू डास अळया नष्ठ केल्या जात आहेत. उघड्या विहरींमधे गप्पी मासे सोड्यात येत आहे. अॅबेटींग करण्यात येत आहे.