अमळनेर अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत १० आॅगस्ट रोजी गुणवंत पाल्यांचा होणार गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ व गरजू, गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण १० ऑगस्ट सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. अमळनेर येथे इंदिरा भवनात सकाळी ९ वाजता ही सभा होईल.
दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेवतीने शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इ १० वी व १२ वी यात ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गंभीर रुग्णांसाठी उपचारांनंतर लागणाऱ्या महागड्या आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण सदरच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक अमृत पाटील यांच्यासह संचालक मंडळ यांनी केले आहे.