साने गुरुजी विद्यालयामध्ये आगी विझवण्याचे दाखवले प्रात्यक्षिक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना अग्निशमन दलातर्फे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांना आग लागल्यास काय करावे आणि सुरक्षितपणे कसे वागावे, यासाठी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. उमेश झंझने यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाची माहिती यावेळी झंझने यांनी दिली. प्रत्यक्ष आग लावून ती कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांच्यासह शिपाई बाळा पवार यांनी करून दाखवले. सूत्रसंचालन वाय. एस. मोरे यांनी केले.