डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमणे तातडीने हटवा अन्यथा आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवदन दिले आहे.  त्यात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरात अंड्याची गाडी, ताडीची दुकाने, मांसाहारी पदार्थ दुकाने यांच्या अतिक्रमणाने व्यापला आहे. तर पुतळ्याच्या मागील बाजूस सुद्धा हातगाड्या, भंगार दुकाने यांचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे पुतळ्याचे पावित्र्य राखले जात नाही. तरी हे अतिक्रमण हटवावे अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरले व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मुख्याधिकारी तुषार नेरकर व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर अतुल पाटील, नितीन जाधव, अनिल बिऱ्हाडे, विशाल सोनवणे, प्रवीण बैसाणे, पवन संदानशिव, सिद्धार्थ वाघ, सोनू चौधरी, किरण सोनवणे, हर्षल पाटील, योगेश सैंदाणे, राहुल वाघ, उदय पाटील, भुपेंद्र शिरसाठ, विकास कुमावत, गौरव माळी यांच्या सह्या आहेत. दरम्यान पालिकेने तिरंगा चौकातील स्मारकाजवळील अतिक्रमण तसेच विविध थोर  पुरूषांच्या स्मारकांजवळ  देखील हातगाड्या किंवा किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले आहे. थोर पुरुषांची विटंबना थांबवण्यासाठी तातडीने अतिक्रमण काढावे अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *