श्री मंगळ ग्रह मंदिरात दुसऱ्या सोमवारी श्रावण निमित्ताने रुद्राभिषेक
अमळनेर (प्रतिनिधी) श्री मंगळग्रह मंदिरात दुसऱ्या सोमवारी बिजासनी माता आश्रम शाळा, अंतुर्लीचे चेअरमन नितीन रामभाऊ पाटील हे सपत्नीक मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात आला.
भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी आणि तुषार दीक्षित यांनी पौराहित्य केले. त्यांना गोपाल पाठक यांचे सहकार्य लाभले. महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता झाली. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, बाळा पवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.