नगांव येथील पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) महसूल सप्ताह अतर्गत नगाव येथील पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरव करण्यात आला. प्रवीण गोसावी हे पोलीस पाटील झाल्यापासून गावात एकही गुन्हा किंवा साधा अदखलपात्र गुन्हा दाखल नाही, गावात दारू विकली जात नाही, सट्टा पिढी नाही, सात वर्षांपासून एक गाव एक गणपती उपक्रम गावकऱ्यांच्या सहकार्याने राबवला जात आहे. महाराष्ट्रात प्रथम लोकनियुक्त सरपंचसह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. महात्मा फुले जलभूमी अभियानात गावाचा प्रथम क्रमांक आला आहे. या सर्व कार्याची दखल घेत उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून प्रवीण गोसावी यांचा सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिप मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, उपविभागीय नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हजर होते. प्रवीण गोसावी यांचा सन्मान झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व पोलिस पाटील संघटनेतर्फ़े स्वागत करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *