कळमसरेत कानबाई मातेला भाविकांनी दिला भावपूर्ण निरोप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव उत्साव साजरा करण्यात आला.
कामानिमित्त बाहेर गावी गेलेले गावागावातील भाऊबंदकितील लोक परिवारासह गावात दाखल झाल्याने, गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या कानबाई उत्सवासाठी तीन दिवस महिला व नागरिकांकडून लगबग व जोडपीच्या जोडपी कानबाई पुजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या. कानबाईची भजन व गायनाचा कार्यक्रम काल रात्रभर होऊन कानबाई जवळ प्रत्येक भाऊबंदकितील महिला व पुरुषांनी गाऊन संगीत तालावर नाचगाने करून नतमस्तक होत जागरण केले. आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सकाळीच 7 वाजेपासून कानबाई विसर्जन तयारीची लगबग दिसत होती. महिला व मुलींनी आपापला खान्देशी पारंपारिक वेषात कानबाईचे जोडप्यांनी पुजन करून प्रसाद वाहुन पारंपरिक सवाद्य विसर्जन मिरवणूकीस सुरूवात केली. गावातील घराघरातून सुवासिनींनी कानबाईचे पुजन करण्यात केले चौका चौकात भजनी मंडळ, डफ व ढोल ताश्याचा गजरात गावकरी कानबाईच्या गाण्यावर व संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते.
चौकात चौकात स्वागत
गावातील संताजी चौक, महाराणा प्रताप चौक, संत सावता माळी चौक, संत गोरोबा काका चौक, संत मीराबाई चौक, दुर्गानगर चौक, महादेव नगर न्यू प्लॉट भागात कानबाई मातेच्या विसर्जन प्रसंगी स्वागत करीत गहू व नारळाची ओटी भरून आरती करण्यात आल्या. महादेव नगर भागातील नवसाचा गणपती व महादेव मंदिरावर कानबाईला विश्रांती देऊन सर्व गावकर्यांनी आरती “कानबाई माता कि जय” म्हणत विसर्जन करण्यात आले.