*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

: 🔷 चालू घडामोडी :- 04 ऑगस्ट 2025

 

◆ भारतीय लष्कराचा ‘एक्सरसाइज ड्रोन प्रहार’ हा लष्करी सराव अरुणाचल प्रदेश येथे पार पडला.

 

◆ SPARSH (सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन रक्षा) हा संरक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे.

 

◆ रशिया देशाने जुलै 2025 मध्ये “जुलै स्टॉर्म” हा प्रमुख नौदल सराव सुरू केला आहे.

 

◆ संरक्षण कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत मजबूत करण्यासाठी “राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA)” संस्थेने वीर परिवार सहाय्य योजना सुरू केली आहे.

 

◆ पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद, SHAPE 2025, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

 

◆ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला ग्लास स्कायवॉक सुरू करण्यात आला आहे.

 

◆ इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची कार्यात्मक संस्था आहे.

 

◆ मध्य प्रदेश राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये युवा शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

 

◆ तुर्की देशाने त्यांचा सर्वात शक्तिशाली पारंपारिक बॉम्ब ‘गॅझॅप’ लाँच केला आहे.

 

◆ राजस्थान सरकारने “हरियालो राजस्थान” मोहिमेअंतर्गत एका दिवसात 2.5 कोटी रोपे लावण्याची मोठी मोहीम सुरू केली.

 

◆ बिहार सरकारने निवृत्त पत्रकारांसाठी बिहार पत्रकार सन्मान योजना (BPSY) सुरू केली आहे.

 

◆ 2025 च्या FISU जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये 5,000 मीटर शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला “सीमा” बनली आहे.

 

◆ राइन-रुहर, जर्मनी येथे FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

 

◆ इंग्लंड देशाने UEFA महिला युरो 2025 चे विजेतेपद जिंकले आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

 

: 🔷 चालू घडामोडी :- 04 ऑगस्ट 2025

 

◆ सिक्किम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

 

◆ छत्तीसगडच्या बस्तर ऑलिंपिकला राष्ट्रीय स्तरावर ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’ असे नाव देण्यात आले आहे.

 

◆ वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध आणि त्याच्या परिणामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिन साजरा केला जातो.

 

◆ वर्ल्ड वाईड वेब दिन 2025 ची थीम “भविष्याचे सशक्तीकरण: समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे” आहे.

 

◆ वर्ल्ड वाइड वेब दिन 2024 ची थीम “Web: A Global Force for Good” अशी होती.

 

◆ अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे.

 

◆ प्रधान मंत्री किसान संपदा योजना (PMKSY) अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते.

 

◆ राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) महिला-नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत.

 

◆ भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे (प्रोजेक्ट 17A) नाव हिमगिरी आहे.

 

◆ न्याय बंधू (Pro Bono Legal Service) ही “न्याय विभाग” या सरकारी विभागाचा उपक्रम आहे.

 

◆ बेंगळुरूस्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने लडाखच्या त्सो कार प्रदेशात HOPE स्टेशन लाँच केले. [ISRO च्या सहकार्याने विकसित]

 

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी 2025 मध्ये बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव “ऑपरेशन नया सवेरा” आहे.

 

◆ वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत फेसलेस अ‍ॅडज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे.

 

◆ प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (PMNDP) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.

 

◆ पॅरा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख (VCOAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *