अमळनेरात उद्या एक शाम लखतदार के नाम भजन संध्या कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) लखतदार भक्त परिवार, अमळनेर व मंगळग्रह संस्थांनातर्फे दि. 5 ऑगस्ट रोजी एक शाम लखतदार के नाम या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह मंदिराच्या प्रसादालयात रात्री 8 वाजता हा कार्यक्रम होईल.
भुसावळ येथील किसन चावराई व समूह भजन संध्या कार्यक्रम सादर करणार आहे. लखतदार भक्त परिवार, अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून सर्व भाविक व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान राजस्थान राज्यातील खाटू श्याम बाबांचा मोठा भक्तपरिवार अमळनेर परिसरात असून अनेक भक्तगण नियमित बाबांच्या दर्शनासाठी जात असतात. यात मोठ्या संख्येने यूवा भक्तांचाही समावेश असून या युवा भक्त परिवारानेच हा कार्यक्रम घडवून आणला आहे.