चर्मकार समाजाची संघटनात्मक बांधणीसाठी झाली बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक ३ रोजी येथील इंदिरा भवनात उत्साहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पारोळा गटविकास अधिकारी संजय टी. मोरे होते. बैठकीत विजय बिऱ्हाडे, सुनील मोरे, रवींद्र मोरे, डी. ए. सोनवणे, अशोक बनसोडे आदींनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे लढा देणे, समाजासाठीच्या विविध शासकीय योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविणे, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करणे, एकंदरीत समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले. पुढील आठवड्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अंतर्गत अमळनेर शहर कार्यकारिणी जाहीर केली जाणार असून त्या समितीच्या माध्यमातून समाजासाठी विकासात्मक ध्येयधोरणे राबविले जातील, असा सर्वानुमते ठरले. सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले. आभार डी. ए. सोनवणे यांनी मानले.